"प्रेमरंग" शब्द दोन परंतु एकरूप झाले तर सारे विश्व आणि भुतलावरील प्रत्येकाला विलोभणीय बनवू शकतात.

माझा एक छोटासा प्रयत्न तुम्हांला या रंगात रंगवायचा आणि या गजबजलेल्या विश्वात तुमच्या हरवलेल्या मनाला तुमच्यावर तुमच्या जोडीदारावर पुन्हा एकदा नव्याने प्रेम करायला प्रवृत्त करायचा.

कवी कुसुमाग्रज असो की श्री. मंगेश पाडगांवकर आणि इतरही अनेक नामांकीत कविंच्या कविता वाचल्या की "तुमचं आमच सेम असलं तरी आयुष्यात एकदा तरी प्रेम करायच असतं" असे सारखं वाटत राहते, मग तारूण्याच्या विश्वात रमत असताना सतत प्रयत्न चालु असतो... आपल्या रूसलेल्या प्रेमाला समजावयाचा-पटवायचा, इतकेच नाही तर लग्नानंतर संसारात हरवलेल्या आपल्या जोडीदाराला पुन्हा एकदा प्रेमात पाडायचा प्रयत्नही काहीजण अगदी उत्साहाने करतात.

मग कल्पना भरारी घेते ती कवितेत, आणि मग चार ओळी प्रेमाच्या सहजच ओठातून निघुन जातात, नाहीच जमली कविता तर प्रेमपत्रांचाही आधार आहेच, आयुष्यभर जोडीदाराला हसत ठेवण्याचा प्रयत्नही अगदी उत्साहाने होतो.

असचं एकांतात तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी कधी लिखाण केल असेलच. जे फक्त आणि फक्त तुमच्या पुरतचं मर्यादीत असेल अथवा जुन्या डायरीत राहीलं असेल. त्या प्रेमरंगाला उजाळा देण्यासाठीचं हे मुक्त व्यासपीठ. मी आपणास आवाहन करत आहे कृपया असे साहित्य,चारोळया, उखाणे जर आपणाजवळ असेल तर आम्हांला नक्की संपर्क करा.